महाराष्ट्र

आनंदराव अडसूळ यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवलं

Published by : Lokshahi News

शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. अडसूळ चार दिवसांपासून गोरेगावच्या लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. मात्र त्यांत्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवलं आहे. आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास त्यांना लाईफलाईन हॉस्पिटलमधून शिफ्ट करण्यात आलं आहे.

शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या राहत्या घरी आणि कार्यालयावर 27 सप्टेंबरला ईडीच्या अधिकाऱ्यांनी धाडी टाकल्या. ईडीचे अधिकारी चौकशी करत असतानाच आनंदराव अडसूळ यांची तब्येत बिघडली. त्यांना लगोलग गोरेगावच्या लाईफलाईन केअरमध्ये अॅडमिट करण्यात आलं. गेल्या 4 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. आयसीयूमध्ये 4 दिवस उपचार करुनही त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना आता दुसऱ्या हॉस्पिटमध्ये हलविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?