महाराष्ट्र

वसई विरार महापालिकेच्या आयुक्तपदी अनिलकुमार पवार

Published by : Lokshahi News

संदिप गायकवाड | वसई विरार महापालिकेचे आयुक्तपदी अनिलकुमार पवार यांची नियुक्ती झाली आहे. दरम्यान त्यांनी सद्यस्थितीतील कार्यपदावरून कार्यमुक्त होऊन वसई विरार महापालिकेचा कारभार संभाळावा असे कार्यआदेश प्राप्त झाले आहे.

वसई विरार महापालिकेचे आयुक्तपदी गंगाधरन डी होते.त्यांची बदली मंत्रालयात झाल्या नंतर त्यांच्या जागी आता वसई विरार महापालिकेचे आयुक्तपदी अनिलकुमार पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नगरविकास विभागाच्या उप सचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी या संदर्भातला आदेस काढला आहे.

दरम्यान आयुक्त गंगाधरन डी यांनी कोवीड काळात महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार स्विकारला होता. यावेळी त्यांनी अनेक धडाकेबाज निर्णय घेतले होते. आता नवनियुक्त आयुक्त अनिलकुमार पवार कसा कारभार पाहतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा