महाराष्ट्र

Anil Mule suicide case । पोलीस उपनिरीक्षक अनिल मुळे आत्महत्या प्रकरण; कुटुंबियांकडून सीबीआय चौकशीची मागणी

Published by : Lokshahi News

वैभव बालकुंदे | अमरावतीच्या फेजरपुरा पोलीस स्टेशनमधील पीएसआय अनिल बंडेप्पा मुळे आत्महत्येप्रकरणात विविध धागे दोरे समोर येत आहेत. आता या प्रकरणी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये मोठ-मोठया पोलीस अधिकाऱ्यांची नावे समोर येत आहेत. त्यातच आता अनिल मुळे यांच्या वडीलांनी या प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय समोर येते ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

अमरावतीच्या फेजरपुरा पोलीस स्टेशनमधील पीएसआय अनिल बंडेप्पा मुळे यांनी 13 ऑगस्टला गळफास घेवून आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली होती. पण ही आत्महत्या का केली हे स्पष्ट झालं नव्हतं. आता या प्रकरणी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये पीएसआय अनिल मुळे रडत-रडत समोरच्या सहकाऱ्याला सांगत होते की, वरिष्ठ पोलीस अधिकारी माझं खूप नुकसान केल्याचं स्पष्ट संभाषणामध्ये ऐकायला मिळते. तब्येत बिघडल्याने मी रजा घेतली होती आणि बरं झाल्यानंतर हजर होण्यासाठी आलो. परंतु कोणीही कर्तव्यावर हजर करून घेतलं नाही. या ऑडिओ क्लिप मध्ये अमरावती शहराचे ACP विक्रम साळी आणि DCP शशिकांत सातव यांचं ही उल्लेख आहे.

अनिल मुळेचे नातेवाईकांनी पोलिसातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचामुळे आत्महत्या केल्याचा आरोप करत आहेत. सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी नातेवाईक करत आहे. गृहमंत्रालयात निवेदन देऊन दाद ही मागितली होती त्यावर काहीही उपाय झाला नाही . शेवटी त्याने आत्महत्या केली याची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी अनिल मुळे यांच्या वडिलांनी केली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा