अनिल परब
अनिल परब  
महाराष्ट्र

अनिल परब यांच्या अडचणीत वाढ; साई रिसॉर्टवर केंद्राची टीम दाखल

Published by : Shweta Shigvan-Kavankar

रत्नागिरी : राज्याचे माजी परिवहन मंत्री व शिवसेना नेते अनिल परब (Anil Parab) यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. केंद्राकडून नेमलेली समिती परबांच्या मुरुडमधील साई रिसाॅर्टवर दाखल झाली आहे. केंद्रीय पर्यावरण खात्याकडून (Environmental Department) टीम साई रिसॉर्टवर चौकशी सुरु आहे.

अनिल परब यांच्या साई रिसॉर्टवर केंद्राकडून नेमलेली पर्यावरण खात्याची पाच जणांची टीम दाखल झाली आहे. टीममध्ये चेन्नईमधील पर्यावरण संस्था आणि महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंटचे अधिकारी यांचा समावेश आहे. अनिल परब यांच्या मुरुडमधील साई रिसॉर्टनं सीआरझेडचे उल्लंघन केल्याचा आरोप भाजप नेते किरिट सोमय्या यांनी केला होता. यानुसार केंद्रीय टीमकडून पर्यावरणाकडून हानीची चौकशी करण्यात येत आहे.

तर, टीम साई रिसॉर्टप्रमाणेच सी कोच रिसॉर्टची देखील चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यामुळे अनिल परब यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे.

दरम्यान, अनिल परब यांच्या मालमत्तांवर ईडीने छापे टाकले होते. 13 तासांच्या चौकशीनंतर ईडीचं पथक त्यांच्या घरातून बाहेर पडलं. यावेळी त्यांनी दापोलीतील साई रिसॉर्टचे मालक हे सदानंद कदम आहेत. कोर्टात त्यांनी त्याबद्दलची माहिती दिली आहे. तसंच हे रिसॉर्ट सुरु झालेलं नाही. मात्र असं असतानाही पर्यावरणाची दोन कलमं लावून सांडपाणी समुद्रात जातं असं सांगून तक्रार करण्यात आली. मात्र हे रिसॉर्ट सुरु नाही असं अनिल परब यांनी सांगितलं. ईडीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तर मी दिले आणि यापूर्वी देखील उत्तर दिली असून, यापुढेही उत्तर देण्याची माझी तयारी आहे, असे अनिल परबांनी सांगितले आहे.

साताऱ्यात देवेंद्र फडणवीस कडाडले, म्हणाले, " उदयनराजेंनी जी कामे हातात घेतली..."

"...म्हणून मी तुमच्याकडे मत मागायला आलोय", साताऱ्याच्या सभेत अजित पवारांनी सांगितलं खरं कारण

IPL 2024 : चेन्नई आणि लखनऊ संघाला मोठा धक्का! स्टार खेळाडू आयपीएलमधून बाहेर, प्ले ऑफचं स्वप्न भंगलं?

टी-२० वर्ल्डकपआधी भारताच्या अडचणी वाढल्या, कर्णधार रोहित शर्माला दुखापत, 'या' खेळाडूनं दिली मोठी अपडेट

"४ जूनला आमचं सरकार दिल्लीत बसणार म्हणजे बसणार"; रत्नागिरी-चिपळूणमध्ये आदित्य ठाकरेंनी पेटवली 'मशाल'