संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अग्रणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे.
कोरोना निर्बंध असले तरी अण्णाभाऊ साठे यांचे अनुयायी सोशल डिस्टन्स पाळून आणि मास्क घालून अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन करत आहेत. पुण्यात देखील सरासबाग चौका जवळील अण्णाभाऊ साठे यांच्या मेघडंबरी पुतळ्या जवळ अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे.
मातंग, बौध आणि इतर सर्व जाती – धर्मातील अनुयायी मोठ्या प्रमाणात अण्णा भाऊ यांना अभिवादन करत आहेत. अण्णा भाऊ साठे यांचं संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील योग दान पाहता अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न किताबाने सन्मानित करण्यात यावं, तसेच मुंबईतील चिरागनगर येथील अण्णां भाऊ साठे यांचा राष्ट्रीय स्मारक लवकरात लवकर महाविकास आघाडी सरकारने पूर्ण करावा अशी मागणी मातंग समाजाकडून करण्यात येत आहे.