महाराष्ट्र

राज्यात स्वतंत्र दिव्यांग कल्याण मंत्रालयाची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा; 2 हजार लोकांची भरती करणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिव्यांगासाठी मोठा निर्णय घेतला आहे. स्वतंत्र दिव्यांग कल्याण मंत्रालयाची घोषणा त्यांनी केली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिव्यांगासाठी मोठा निर्णय घेतला आहे. स्वतंत्र दिव्यांग कल्याण मंत्रालयाची घोषणा त्यांनी केली आहे. यासोबतच, या विभागात 2 हजार 63 लोकांची भरती करणार असल्याची माहिती त्यांनी दिले आहे. तसेच, खोके-खोके सरकार म्हणणाऱ्यांना जर दिव्यांगांच्या एवढे बौद्धिक डोके आले तरी खूप झाले, असा टोलाही शिंदेंनी शिवसेनेला लगावला आहे. जागतिक दिव्यांग दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

एकनाथ शिंदे म्हणाले की, स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग असला पाहिजे, अशी कडू यांची मागणी होती. हे सर्वसामान्य हिताचे सरकार आहे. ज्या दिवशी कारभार हाती घेतला. तेव्हापासून राज्यांचे हिताचे निर्णय घेत आहे. लाखो रोजगार देण्याचे काम सुरू आहे. 75 हजार शासकीय नोकऱ्या देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. तसेच, नियुक्ती करण्याचा कार्यक्रम आपण सुद्धा घेतला.

तीन टक्के लोक अपंग आहेत. स्वतंत्र दिव्यांग कल्याण मंत्रालय घोषणा करत आहोत. दिव्यांगासाठी स्वतंत्र विभाग केला जाईल. यामध्ये 2 हजार 63 लोकांची भरती केले जाईल. या विभागाला स्वतंत्र सचिवही असणार आहे. हे सरकार संवेदनशील आहे. आम्हाला भावना कळतात. 24 दिवसांत विभाग झाला आहे. हा काय छोटा मोठा निर्णय नव्हे. बाळासाहेब ठाकरे यांना सुद्धा दिव्यांगांवर प्रेम होते. केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदी यांनी कोठेही पैसे कमी पडणार नाही, असे सांगितले आहे.

मंत्रालयासाठी विकासाला 1143 कोटी दिव्यांग मंत्रालयासाठी तरतूद करण्यात आले आहेत. देशातला पहिला हा निर्णय आहे. जे दिव्यांग वर गुन्हे दाखल झाले होते राज्य सरकार गुन्हे मागे घेणार, अशीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

बच्चू भाऊ कधी खोके घेतील का, असा प्रश्न विचारत एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, खोके-खोके सरकार म्हणणाऱ्यांना जर दिव्यांगांच्या एवढे बौद्धिक डोके आले तरी खूप झाले. ज्यांनी रोखने व्यवहार केले त्यांना फक्त खोक्यांचीच भाषा समजते. तुम्ही आरोप करत रहा मात्र आम्ही कामातून उत्तर देऊ, असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा