महाराष्ट्र

लाचलुचपत प्रतिबंधक विभागच संशयाच्या भोवऱ्यात; पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांनी केले गंभीर आरोप

लाचलुचपत प्रतिबंधक विभागच संशयाच्या भोवऱ्यात अडकला असल्याचं समोर आले आहे.

Published by : Team Lokshahi

महेश महाले, नाशिक: नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक पदी शर्मिष्ठा वालावलकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर, नाशिक विभागातून सर्वात जास्त कारवाया करण्यात आल्या होत्या. मात्र आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागच संशयाच्या भोवऱ्यात अडकला असल्याचं समोर आले आहे. पोलीस उपनिरीक्षकाच्या कुटुंबीयांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग खोट्या कारवाई करत असल्याचे सांगितले आहे आणि यासंबंधीचे पुरावे ही त्यांनी दिले आहेत.

नाशिक विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक पदी शर्मिष्ठा वालावलकर यांनी पदभार स्वीकारला आणि एका नंतर एक धडाधड कारवाया नाशिक विभागातून करण्यात आल्या. 30 ते 40 लाख रुपये रंगेहात लाच स्वीकारतानाच्या कारवाया देखील नाशिकमधूनच झाल्या. संपूर्ण राज्यात लाचखोरीमध्ये नाशिक विभाग अवल ठरला आणि हा भ्रष्टाचार मोडीत काढण्यासाठी शर्मिष्ठा वालावलकर यांनी लाच घेणाऱ्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर कारवाई केली.

अशीच एक कारवाई नाशिक रोड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक गणपत महादू काकड यांच्यावर करण्यात आली होती. पाच हजार रुपयाची लाच घेताना त्यांना अटक करण्यात आली होती. मात्र काकड यांच्यावर झालेली कारवाई चुकीची असल्याचे काकड कुटुंबीयांनी सांगितले आहे. यासंबंधीचे पुरावे देखील त्यांनी माध्यमांना दिले आहेत.

काकड यांच्या घरी पंचनामा करतेवेळी जे कर्मचारी यांची नावे तसेच पंचनामा करतानाची वेळ पंचनाम्यात दिलेली आहे. ही चुकीची आहे. कारण ज्यावेळी घरझडती सुरू असताना कर्मचाऱ्यांची नावे दाखवली गेली, त्यावेळी ते कर्मचारी म्हसरूळ पोलीस ठाण्यामध्ये असल्याचं त्यांनी सीसीटीव्ही फुटेज च्या माध्यमातून पुरावे दिले आहेत. त्यामुळे काकडे यांच्यावर झालेली कारवाई संपूर्ण पद्धतीने चुकीची आहे आणि अशाच पद्धतीने इतर कारवाया झाल्या असल्याचा संशय देखील काकड कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. जर न्याय मिळाला नाही तर मंत्रालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

एकूणच लाचखोरींच्या कारवाया नाशिकमधून समोर येत असताना, आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कामावरच पोलीस दलातील एका अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांनी संशय व्यक्त केल्याने आश्चर्य व्यक्त केला जात आहे. काकड यांच्यावर लाच घेतानाचा सीसीटीव्ही फुटेज काकड कुटुंबीयांनी महितीच्या अधिकारखाली मागवले. यात काकड यांच्या खिशामध्ये अँटी करप्शन चा कर्मचारी पैसे टाकत असल्याचे निदर्शनास आले आहेत.

मात्र हा आमच्या कारवाईचाच एक भाग असल्याचं लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. लाच घेतानाच डेमो आम्हाला दाखवावा लागतो. काकड कुटुंबियांनी केलेले सर्व आरोप हे तथ्यहीन असल्याचं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी सांगितलं आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चुकीच्या पद्धतीने कारवाया करत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या अगोदर देखील अनेक अधिकारी आणि कर्मचारी यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये गोवण्यात आल्याचे देखील त्यांनी सांगितलय त्यामुळे अँटी करपशन विभाग संशयाच्या भवऱ्यात आल्याने पोलीस अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांनी केलेल्या आरोपावर पुढे काय चौकशी होते हे बघ ना महत्त्वाचं ठरणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम; साताऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर

Raj Thackeray - Uddhav Thackeray : विजयी मेळाव्यात 'या' नेत्यांचीही होणार भाषणं; तर उद्धव ठाकरेंच्या भाषणाचे होईल समारोप