महाराष्ट्र

अँटिलिया स्फोटक प्रकरण केवळ प्रसिद्धीसाठी?

Published by : Lokshahi News

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ एका गाडीत जिलेटिनच्या कांड्या सापडल्या होत्या. याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली आहे. एनआयए या प्रकरणाचा कसून तपाय करीत आहे. हे प्रकरण कुठल्याही दहशतवादाशी संबंधित नसल्याच्या निष्कर्षावर तपास यंत्रणा आली आहे. विशेष म्हणजे, केवळ प्रसिद्धीसाठी हे सर्व नाट्य घडवल्याचा दावा केला केला जात आहे.

सचिन वाझेंनी हे सारे केवळ प्रसिद्धीसाठी घडवले आहे, असा हा दावा हिंदुस्थान टाइम्स या इंग्रजी दैनिकाने केला आहे. एनआयएच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिल्याचे या दैनिकाने म्हटले आहे. सचिन वाझे यांनी 24 फेब्रुवारीच्या मध्यरात्री स्वत: स्कॉर्पिओ चालवत अंबानींच्या घराजवळ ही गाडी उभी केली. त्यानंतर त्यातून पीपीई किट सदृष्य कपड्यांत ते बाहेर पडले आणि इनोव्हा गाडीत बसून निघून गेले.

ख्वाजा युनूस प्रकरणानंतर आपली गेलेली पत पुन्हा मिळविण्यासाठी वाझेंनी हे सर्व नाट्य घडवले होते. तसेच बॉम्बस्फोटसारख्या प्रकरणांचा तपास लावण्यास आपण सक्षम असल्याचे त्यांना दाखवायचे होते. एकूणच 16 वर्षांनंतर पुन्हा पोलीस सेवेत आल्यामुळे त्यांना पुन्हा प्रकाशझोतात यायचे होते, असे या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. यासाठी सचिन वाझे यांनी पद्धतशीरपणे स्कॉर्पिओमध्ये जिलेटिनच्या 20 कांड्या ठेवून खळबळ उडवून दिली. अपेक्षेप्रमाणे क्राइम इंटेलिजन्स युनिटचे (सीआययू) प्रमुख म्हणून तपास त्यांच्याकडेच आला. यापुढे कसे घडत गेले किंवा घडवून आणले, याबाबत एनआयएच्या अधिकाऱ्याने अधिक माहिती दिलेली नाही, असेही हिंदुस्तान टाइम्सने स्पष्ट केले आहे.

या प्रकरणाचा दहशतवादाशी नाही, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. तथापि, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनआयएकडून अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही.

घटनाक्रम

  • 24 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीनंतर जिलेटिनच्या 20 कांड्या असलेली स्कॉर्पिओ अंबानींच्या घराजवळ ठेवण्यात आली
  • 25 फेब्रुवारीला पोलिसांनी गाडी ताब्यात घेऊन तपास सुरू केला
  • 5 मार्च रोजी मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्र्यातील रेती बंदरमध्ये सापडला
  • 8 मार्चला या प्रकरणाचा तपास क्राइम ब्रांचकड़ून एनआयएकडे देण्यात आला
  • 11 मार्च रोजी एकाच दिवसात वाझेंची दोनदा बदली करण्यात आली
  • 13 मार्चला सचिन वाझेंना एनआयएकडून अटक
  • 15 मार्च रोजी सचिन वाझे पोलीस सेवेतून निलंबित

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pune Bhausaheb Rangari Ganpati : ढोल-ताशांचा गजरात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान

CM Devendra Fadnavis Meet Raj Thackeray : उद्धव ठाकरे नंतर मुख्यमंत्र्यांची शिवतीर्थावर उपस्थिती, नेमकं प्रकरण काय?

Manoj Jarange Azad Maidan : "माझ्या वडिलांना काय झाले तर त्याला..." जरांगेंच्या मुलीचा सरकारला इशारा

Eknath Shinde on Manoj Jarange Protest : "सरकार सर्व जातीपातीचा विचार..." जरांगेंच्या आंदोलनावर उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया