महाराष्ट्र

ईदच्या मिरवणुकीत महाराष्ट्राचा देखावा अन् वाजले शिवसेनेचे गाणे; व्हिडीओ व्हायरल

व्हिडीओ हिंदु-मुस्लीम समाजाचे ऐक्य राखण्याचे उदाहरण देत आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

एकीकडे काही जण समाजामध्ये दुही निर्माण करत आहेत. तर, दुसरीकडे एक सुंदर उदाहरण समोर येत आहे. ईद-ए-मिलादनिमित्त राज्यभरात ठिकठिकाणाहून मिरवणुका निघाल्या होत्या. मुस्लिम समाजानेही यात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. अशाच एका मिरवणुकीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ईदनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत महाराष्ट्राचा नकाशा साकारण्यात आला असून यात जय महाराष्ट्र असे लिहीले आहे. तर, व्हिडीओमध्ये शिवसेनेचे थीम सॉंगही ऐकायला येत आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे अद्याप समोर आलेले नाही. पण, हा व्हिडीओ आता नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत असून कौतुक करताना दिसत आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा