महाराष्ट्र

अंगावर चिखल उडाला म्हणून वाद; कोयत्यांनी केली वाहनांची तोडफोड

दहा ते बारा जणांनी कोयत्यांनी केली वाहनांची तोडफोड

Published by : Shweta Shigvan-Kavankar

अमोल धर्माधिकारी | पुणे : अंगावर चिखल उडाला म्हणून झालेल्या वादातून दहा ते बारा जणांच्या टोळीने डोणजे येथे रात्रीच्या वेळी येऊन एक दुचाकी व एका कारची कोयत्यांनी तोडफोड केली आणि दहशत निर्माण केल्याची घटना घडली आहे. इजाज मुनीर शेख या तरुणाने याबाबत हवेली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यानुसार शिवप्रसाद उर्फ मन्या किसन चोरघे (अंदाजे वय 22 वर्ष) याच्यासह त्याच्या दहा ते बारा अज्ञात साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपी धायरी परिसरातील आहेत.

फिर्यादी इजाज हा डोणजे येथील त्याच्या घराजवळ मुख्य रस्त्याच्या कडेला थांबलेला असताना सिंहगडाकडून येणाऱ्या दुचाकीमुळे त्याच्या अंगावर चिखल उडाला. त्यातून इजाज व दुचाकीवरील तरुणांची शाब्दिक बाचाबाची व हाणामारी झाली. स्थानिकांनी मध्यस्थी करुन ही भांडणे सोडवली. दुसऱ्या दिवशी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अचानक तोंडाला रुमाल बांधून, हातात मोठमोठे कोयते घेऊन दहा ते बारा जण दुचाकींवरुन आले व मोठ्या आवाजात शिवीगाळ करत एक स्विफ्ट कार व बुलेट मोटारसायकलची तोडफोड केली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Rajshree More Apologizes : मराठी विरोधात वादग्रस्त विधान करणाऱ्या अभिनेत्रीने अखेर मागितली माफी; Video Viral

Ashish Shelar on Vijayi Melava : "निवडणूकपूर्व जाहिरात...", मुंबईत ठाकरे-राज ठाकरेंच्या मेळाव्यावर आशिष शेलारांचा जोरदार हल्लाबोल

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी ब्राझील दौऱ्यावर! दहशतवाद आणि जागतिक व्यापार अजेंड्यावर चर्चा?

Latest Marathi News Update live : पुण्यात अमली पदार्थांचा सुळसुळाट