महाराष्ट्र

लालबागचा राजा मंडळात पहिल्याच दिवशी वाद; महिला भाविक अन् सुरक्षा रक्षकांमध्ये धक्काबुक्की

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : दोन वर्षाच्या कालावधीनंतर राज्यभरात गणरायाचं मोठ्या उत्साहात आगमन होत आहे. मुंबईच्या प्रसिध्द लालबागचा राजाही मंडपात विराजमान झाला आहे. लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी होत आहे. परंतु, पहिल्याच दिवशी वाद झाला आहे. महिला भाविक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये धक्काबुक्की झाली आहे.

मुंबईच्या लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यांतून भाविक मुंबईत हजेरी लावतो. आज पहिल्या दिवसापासूनच भाविकांची अलोट गर्दी केली आहे. अशात महिला भाविकाने इतक्या वेळ मुख दर्शनाच्या रांगेत थांबून आलो आहे. आम्हाला जास्त वेळ मंडपात थांबू द्यावे, अशी मागणी केली होती. परंतु, गर्दी जास्त असल्याने सुरक्षा रक्षकांनी रांग पुढे घेत होते. यामुळे महिला भाविक आणि सुरक्षा रक्षकामध्ये शाब्दिक चकमक झाली. नंतर याचे रुपांतर धक्काबुक्कीत झाले.

यामध्ये पोलिसांनी मध्यस्थी करण्यात प्रयत्न केला असता महिला भाविकाने पोलिसांनाही धक्काबुक्की केली. यामुळे काही काळ मंडपात तणावाचे वातावरण होते. आता परिस्थिती नियंत्रणात आली आहे. दरम्यान, याआधीही अनेक वेळा लालबागच्या राजाच्या दर्शनावरुन धक्काबुक्कीचे प्रकार घडले आहेत.

संजय राऊत यांच्याविरोधात छत्रपती संभाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

राज ठाकरे यांची आज मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी पुण्यात सभा

"मोदी तुम्ही माझ्याशी लढा, माझ्या आई-वडीलांचा अपमान केला, तर..."; उद्धव ठाकरेंनी PM मोदींना दिला इशारा

Dora Cake Recipe: मुलांच्या आवडीचा ‘चॉकलेट डोरा केक’ बनवा घरच्याघरी, जाणून घ्या रेसिपी...

Akshay Tritiya 2024: अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व