महाराष्ट्र

“शिविगाळ करणाऱ्या रणजित कांबळेंना त्वरीत अटक करा”

Published by : Lokshahi News

राज्याचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांनी वर्ध्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांना अर्वाच्य भाषेत केलेले शिवीगाळ प्रकरण तापत चालले आहे. या प्रकरणात भाजप आक्रमक झाली असून रणजित कांबळे यांना त्वरीत अटक करण्याची मागणी होत आहे.

आमदार रणजित कांबळे यांनी वर्धा जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांना फोनवरून असभ्य भाषेत शिवीगाळ केली होती. या प्रकरणानंतर भाजपाचे खासदार रामदास तडस यांनी आज पत्रकार परिषदेत घेतली. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आमदार कांबळे यांना अटक करण्याची मागणी पोलिसांकडे केली. खासदार तडस म्हणाले, "आमदार कांबळे यांनी यापूर्वीही अनेक अधिकाऱ्यांना धमकावलं आहे. परंतु एकाही अधिकाऱ्याने तक्रार न केल्यानं कांबळेंची हिंमत वाढली. अनेक अधिकारी विनंतीवर बदली करून घेत जिल्हा सोडून गेले. मात्र, डॉ. डवले यांनी हिंमत दाखवून पोलीस तक्रार केली. या तक्रारीची तत्काळ दखल न घेतल्यास आरोग्य यंत्रणा नाराज होऊ शकते. याचा विपरित परिणाम लोकांच्या आरोग्यावर झाल्यास कांबळे हेच जबाबदार असतील. त्यामुळे कांबळे यांना अटक करावी," अशी मागणी तडस यांनी केली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा