थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Nilesh Ghaiwal )निलेश घायवळ प्रकरणी अनेक खुलासे समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता निलेश घायवळ गँग संदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. निलेश घायवळ याचा नंबरकारी असलेल्या अजय सरोदे याच्या घरी तब्बल 400 काडतूस सापडले असल्याची माहिती मिळत आहे.
200 जिवंत काडतूस तर 200 रिकाम्या पुंगळ्या सापडल्या आहेत. अजय सरोदे आणि बटर्या चौधरी या दोघांना कोथरूड पोलिसांनी गाणगापूर,कर्नाटक येथून तीन दिवसांपूर्वी अटक केली. अजय सरोदे यांच्या चौकशीत माहिती समोर आल्यानंतर त्याच्या घराची झडती पोलिसांनी घेतली.
17 सप्टेंबरला कोथरूड भागात घायवळ टोळीने एकावर गोळीबार केला होता त्यावेळी अजय सरोदे घटनास्थळी उपस्थित होता. त्यामुळे त्या गुन्ह्यात अजय सरोदे हा ही आरोपी होता. अजय सरोदे याच्याकडे पिस्तुल परवाना असल्याचं आता समोर आले असून त्याला 29 जानेवारी 2024 ला पोलिसांनी पिस्तुल परवाना दिल्याची माहिती समोर आली आहे.
Summery
निलेश घायवळ गँग संदर्भात धक्कादायक माहिती समोर
निलेश घायवळ याचा नंबरकारी असलेल्या अजय सरोदे याच्या घरी सापडले तब्बल 400 काडतूस
200 जिवंत काडतूस तर 200 रिकाम्या पुंगळ्या सापडल्या आहेत