महाराष्ट्र

राष्ट्रीय महामार्गाच्या सर्विस रोडवर आग आटोक्यात न आल्याने गाडी पूर्ण जळून खाक

Published by : Lokshahi News

तासवडे तालुका कराड येथील एमआयडीसीतील रस्त्यावरील चौकात अचानक दुचाकी मोटारसायकलने पेट घेतला याआगीत दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली, असून मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान ही द बर्निंग बाईकचा थरार पाहण्यासाठी घरी परतणारे कामगार व नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. काल सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आशियाई महामार्गावर तासवडे टोल नाक्यां जवळ एमआयडीसीतील रस्त्यावर हायवे जवळच्या मुख्य चौकात बजाज पल्सर दुचाकीने अचानक पेट घेतला चालकाच्या लक्षात सदर बाब आल्यानंतर त्याने दुचाकी तात्काळ रस्त्यावर सोडून दिली क्षणार्धात भडका उडाल्याने दुचाकी जळून खाक झाली. नेमके एमआयडीसी मधून कामगार सुटले असतानाच ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. घटनास्थळी आगीचा मोठा भडका निर्माण झाला त्यामुळे बघ्यांची मोठी गर्दी निर्माण झाली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा