महाराष्ट्र

Assembly session : विधानसभेचं विशेष अधिवेशनाची तारीख बदलली, रविवारी अध्यक्षपदाची निवड होणार

गेल्या अनेक दिवसांपासून विधानसभा अध्यक्षपद (Assembly Speaker) रिकामे आहे. यासाठी आता लवकरच नियुक्ती केली जाणार असून राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe Patil) यांच्या नावाची चर्चा आहे. या सरकारकडून लवकरच विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाणार आहे.

Published by : Shweta Chavan-Zagade

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर काल एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आता एकनाथ शिंदे यांना बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. मात्र त्यापूर्वीच विधान सभेचे विशेष अधिवेशन एका दिवसाने पुढे ढकलण्यात आले आहे. हे विशेष अधिवेशन 2 आणि 3 जुलै रोजी होणार होते मात्र आता हे अधिवेशन 3 आणि 4 जुलै रोजी म्हणजेच रविवारी आणि सोमवारी पार पडणार आहे. तसेच गेल्या अनेक दिवसांपासून विधानसभा अध्यक्षपद (Assembly Speaker) रिकामे आहे. यासाठी आता लवकरच नियुक्ती केली जाणार असून राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe Patil) यांच्या नावाची चर्चा आहे. या सरकारकडून लवकरच विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाणार आहे.

विधान सभेच्या विशेष अधिवेशनातच रविवारी विधानसभा अध्यक्षपदाची निवड होणार आहे तर सोमवारी विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बहुमत सिद्ध करावे लागेल.

विधासभा अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावाची चर्चा

विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील यांचं नाव चर्चेत आहे. याशिवाय शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांचे देखील नाव चर्चेत आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात नाना पाटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर मागील दोन दिवसांपूर्वी विधानसभा उपाध्यक्ष म्हणून नरहरी झिरवळ यांच्याकडे कारभार सोपवण्यात आलेला होता. आता शिंदे सरकार सत्तेता आल्यानंतर या विशेष अधिवेशनात सगळ्यात आधी विधाानसभा अध्यक्षांची निवड पार पडेल.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup 2025 : ब्रोंको टेस्ट पास करा तरचं संघात चान्स! BCCI चा नवा नियम; ब्रोंको टेस्ट म्हणजे काय? Bronco Test

Rohit Pawar : शिखर बँक घोटाळाप्रकरणी आमदार रोहित पवारांची जातमुचलक्यावर सुटका

Raigad Boat Accident : रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, बचावकार्य युद्धपातळीवर

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली