कल्पना नालस्कर | नागपूर : सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाने पोलिस मुख्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. शशी शेंडे असे या सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाने नाव आहे.
सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शशी शेंडे यांना दोन दिवसांपूर्वी कर्करोगाचे निदान झाले होते. त्यातून आलेल्या नैराश्यामुळे शेंडे यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जाते आहे. त्यांच्या पत्नी ज्योती शेंडे या पोलिस विभागात क्लर्क आहेत. त्यांच्या मागे आई, वडील, दोन मुले असा परिवार आहे. दरम्यान, या आत्महत्येमागे दुसरे कोणते कारण नाही ना, याचाही पोलीस शोध घेत आहेत.