महाराष्ट्र

'यूपीआय' मुळे एटीएम धोक्यात; कॅश बाळगण्याची गरज संपली

यूपीआय पेमेंट्सच्या वाढत्या वापरामुळे एटीएमची संख्या कमी होत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार, डिजिटल पेमेंट्समुळे लोकांनी कॅश बाळगणे कमी केले आहे.

Published by : shweta walge

थोडक्यात

  1. यूपीआय पेमेंटचे प्रमाण वेगाने वाढल्यामुळे लोकांनी मोबाइलद्वारे लहानमोठी पेमेंट्स करणे सुरू केले आणि कॅश बाळगण्याचे प्रमाण कमी

  2. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार, डिजिटल पेमेंट्सच्या वाढत्या वापरामुळे देशभरातील एटीएमच्या संख्येत घट

  3. यूपीआय आणि डिजिटल पेमेंट्समुळे पारंपारिक कॅश विथड्रॉवलच्या गरजा कमी झाल्यामुळे एटीएम नेटवर्क्सवरील दबाव कमी

देशात यूपीआय पेमेंटचे प्रमाण वेगाने वाढले आहे. लहानमोठी पेमेंटही मोबाइलने करणे शक्य झाल्याने लोकांनी कॅश बाळगणे कमी केले आहे. याचा परिणाम आता एटीएम होत आहे. कारण एटीएमची संख्या आता कमी होत आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या आकडेवारीतून देशातील एटीएमच्या संख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार सप्टेंबर २०२३ मध्ये देशातील एटीएमची संख्या २,१९,००० इतकी होती. वर्षभरात सप्टेंबर २०२४ ही संख्या घटून २,१५,००० वर आली आहे. या शिवाय शहरांमध्येही कमी ग्राहक असलेली एटीएम बंद करावी लागली आहेत किंवा त्यांच्या जागा बदलल्या आहेत. यूपीआय हाताळण सोप्प झाल्यामुळे एटीएमचा वापर कमी होत असल्या समजत आहे.

आकड्यांकडे पाहीले तर ऑफ साईट एटीएमच्या संख्येत गेल्या चार वर्षांत घट सुरु आहे.

सप्टेंबर 2021 मध्ये ऑफ साईट एटीएम 97,383 होते

सप्टेंबर 2022 मध्ये ऑफ साईट एटीएम 97,072 झाले सप्टेंबर 2023 मध्ये ऑफ साईट एटीएम 93,751 राहीले

सप्टेंबर 2024 मध्ये ऑफ साईट एटीएम 87,838 उरले

म्हणजे साल 2021 तुलनेत साल 2024 मध्ये ऑफ साईट एटीएमची संख्या सुमारे 10 टक्के घटली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा