महाराष्ट्र

कार्यालयातच नायब तहसीलदारांवर भावाकडूनच जीवघेणा हल्ला

हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात

Published by : Team Lokshahi

विकास माने| बीड

बीडच्या केज (Beed)तहसील कार्यालयात नायब तहसीलदारावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आलीय. विशेष म्हणजे नायब तहसीलदारांच्या सख्या भावानेच (Crime)त्यांच्यावर हल्ला केला. दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. (naib tehsildar in beed district)

आशा वाघ असे जखमी नायब तहसीलदारांचे नाव आहे. त्या नेहमीप्रमाणे तहसील कार्यालयात आस्थापना शाखेत बसल्या असताना त्यांच्या सख्ख्या भावाने या ठिकाणी येऊन गोंधळ घातला. दोघांमध्ये काही वेळ बाचाबाची झाली. या दरम्यान अचानक धारदार कोयत्याने हल्ला चढवत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी कर्मचाऱ्यांनी हल्लेखोर भावाला रूममध्ये कोंडून पोलिसांना पाचारण केलं. सध्या जखमी झालेल्या आशा वाघ यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आल असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. हा सर्व प्रकार संपत्तीच्या वादातून घडला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा