महाराष्ट्र

समाजसेवक हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत

अहमदनगर जिल्ह्यात सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर शनिवारी प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर शनिवारी प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला आहे. दरम्यान, उपचारानंतर हेरंब कुलकर्णींची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्या पत्नी प्रतिमा कुलकर्णी यांनी सांगितले आहे.

हेरंब कुलकर्णी सीताराम सारडा विद्यालयाचे मुख्याध्यापक आहेत. हेरंब कुलकर्णी शनिवारी हे शाळेतून परत असताना ही घटना घडली. तीन तरुणांनी त्यांची गाडी अडवत लोखंडी रॉडने जबर मारहाण केली. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली असून ४ टाके पडले आहेत.

सध्या हेरंब कुलकर्णी यांची प्रकृती स्थिर असून ते विश्रांती घेत असल्याचं पत्नी प्रतिमा यांनी सांगितले. याप्रकरणी तोफखाना पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्यापही कोणाला अटक न केल्याने सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?