महाराष्ट्र

‘ज्याची वकिली केलीत तो मनसुखचा खुनी निघाला’; अतुल भातखळकरांची मुख्यमंत्र्यांवर टीका

Published by : Lokshahi News

आधी अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि आता माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह प्रकणात महाविकास आघाडी सरकारवर भाजपाने जोरदार हल्लाबोल केला आहे. या सर्व प्रकरणी आता एटीएसने घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोठा खुलासा केला आहे. मनसुख हिरेन यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पत्नी विमल हिरेन यांनी सचिन वाझे यांचा मृत्यूमागे हात असल्याचा संशय व्यक्त केला होता. यानंतर एटीएसने तपास हाती घेत या प्रकरणातील महत्वाचे खुलासे केले आहेत. या पार्श्वभूमीवर एटीएसची पत्रकार परिषद झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांना तोंड लपवायला जागा उरली आहे का? असा सवाल करत अतुल भातखळकरांची मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका आहे.

एटीएसची पत्रकार परिषद झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांना तोंड लपवायला जागा उरली आहे का? विधीमंडळ अधिवेशनात आपण ज्याची वकिली केलीत तो मनसुख चा खुनी निघाला. थोडी लाज शिल्लक असेल तर तोंड काळे करा असे म्हणत भातखळकरांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा