महाराष्ट्र

खोट्या ऑडिओ क्लीप व्हायरल करुन बदनामी; रामदास कदम यांनी फेटाळले आरोप

Published by : Lokshahi News

शिवसेना संदर्भातील सर्वांत मोठी बातमी समोर आली आहे. एक ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लीपने राजकारणात खळबळ उडवली आहे. या ऑडिओ क्लीपमध्ये एका प्रकरणाचा दाखला देत, गुन्हा दाखल झाला तर परब यांना राजीनामा द्यावा लागेल, असंही कदम म्हणत असल्याचे बोलले जात आहे. या ऑडिओ क्लीपवर आता रामदास कदम यांनी आरोप फेटाळले आहेत.

विधानसभा निवडणुकीच्यावेळी देखील माझ्या आवाजाच्या ऑडिओ क्लीप बनवून व्हायरल करण्यात आल्या होत्या. त्या ऑडिओ क्लीपमध्ये मी मुस्लिम समुदायाला शिवीगाळ करत असल्याचा दावा करण्यात आला होता. गेल्या दोन महिन्यांमध्ये दहावेळा या विषयावर पत्रकार परिषदा घेतल्या आहेत. त्यांनी माझ्यावर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी मी अब्रुनुकसाणीचा दावा टाकलेला आहे.

प्रसाद कर्वेसोबत माझा कुठलाही संबंध नाही. किरीट सोमय्यांशी माझा कुठलाही संबंध नाही. उलटपक्षी जो मुलगा आहे तो वैभव खेडेकरांच्या जवळचा कार्यकर्ता आहे. त्या दोघांनी मिळून हे केलं की काय? असं मला वाटत आहे. अनिल परब यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत. मी शिवसेनेचा नेता आहे. त्याची मला पूर्णपणे जाणीव आहे. आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. माझा मुलगा तिथे आमदार आहे. संजय कदम यांना पाडून तो आमदार बनलेला आहे. मी या गोष्टीचा निषेध करतो. हे पाप आहे. ते माज्या हातून घडणार नाही. खोट्या क्लीप व्हायरल करुन मला बदनाम करण्याचे प्रयत्न अनेकदा झाले होते. रामदास कदम बोलल्यानंतर मोठी प्रसिद्धी मिळते.
याच्याआधीही माझी बदनामी झाल्याचा दावा मी ठोकलाय. आता पुन्हा मी न्यायालयात जाणार आहे. किरीट सोमय्या यांच्याशी आमचा दुरान्वयेही संबंध नाही. मी पाठीत खंजीर खुपसणारा नाही.

ऑडिओ क्लिपमध्ये काय ?

या कथित ऑडिओ क्लिपमध्ये अनिल परब यांच्या बांद्रेमधील कार्यालय तोडण्याविषयी संभाषण आहे…आणि याबद्दल शिवसेना नेते रामदास कदम व्हेरी गूड असं म्हणताहेत… एवढंच नाही तर गुन्हा दाखल झाला तर परब यांना राजीनामा द्यावा लागेल, असंही कदम म्हणताहेत…. ही कथित ऑडिओ क्लिपजशी आहे तशी लोकशाही दाखवत आहे… या ऑडिओ क्लिपला लोकशाही पुष्टी करत नाही….

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा