महाराष्ट्र

औरंगाबादच्या नामांतरानंतर कॉंग्रेसमध्ये राजकीय भूकंप, आतापर्यंत 200 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

औरंगाबाद शहर जिल्हा अध्यक्ष हिशाम उस्मानी यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर औरंगाबाद शहर काँग्रेसच्या (Congress) तब्बल 200 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Published by : Shweta Chavan-Zagade

औरंगाबाद शहराच्या संभाजीनगर नामकरणाच्या प्रस्तावाला महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi ) सरकारच्या अखेरच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. या मंजुरीनंतर औरंगाबाद काँग्रेसमध्ये आता संतापाची लाट पसरली आहे. औरंगाबाद शहर जिल्हा अध्यक्ष हिशाम उस्मानी (Hisham Osmani ) यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर औरंगाबाद शहर काँग्रेसच्या (Congress) तब्बल 200 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

गेल्या अनेक दशकांपासून औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर व्हावे अशी मागणी शिवसेना, भाजप आणि हिंदुत्त्ववादी संघटनेकडून करण्यात येत होती. या मागणीला वेळोवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांकडून विरोध करण्यात येत होता. मात्र, बुधवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या महत्वपूर्ण मंत्रिमंडळ बैठकीत अपेक्षेप्रमाणे नामांतराचे मोठे निर्णय घेण्यात आले. त्यानुसार, औरंगाबाद शहराच्या 'संभाजीनगर' नामकरणास आणि उस्मानाबाद शहराच्या 'धाराशीव' नामकरणास कॅबिनेटने मान्यता दिली. दोन शहरांच्या नामांतराचा प्रश्न गेली 25 ते 30 वर्ष होता. अखेर उद्धव ठाकरे यांनी आपल्या सरकारचं काऊंडडाऊन सुरु असताना दोन मोठे निर्णय घेतले.

अनेक वर्षे नामकरणाला विरोध करणारा काँग्रेस पक्ष राज्यात सत्तेत असताना प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने औरंगाबादेतील काँग्रेसमधील मुस्लिम पदाधिकाऱ्यांमध्ये संताप आणि नाराजी आहे. यामुळे अनेकांनी पदाचा राजीनामा दिला आहे. सर्वप्रथम काँग्रेसचे औरंगाबाद शहर जिल्हाध्यक्ष हिशाम उस्मानी यांनी पदाचा राजीनामा दिल्याचे फेसबुक पोस्ट वरून जाहीर केले. हा राजीनामा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांना पाठविल्याचे त्यांनी पोस्टमध्ये सांगितले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात