महाराष्ट्र

एसटी बसचा उड्डाणपूलावर अपघात; एक जण गंभीर

Published by : Shweta Shigvan-Kavankar

सुरज दाहट | अमरावती : औरंगाबाद येथून नागपूरकडे भरधाव जाणाऱ्या एसटी बसचा अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गवरील नांदगाव पेठ येथील उड्डाणपुलावर भीषण अपघात झाला. सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली आहे. यामध्ये बस चालक गंभीर जखमी झाला असून बसमधील प्रवासी मात्र सुखरूप बचावले आहेत. एसटी बस ही उड्डाणपुलावर कोसळताना थोडक्यात बचावली.

नागपूर आगारची औरंगाबाद-नागपूर बस (क्र.एम.एच. ४०, वाय. ५८२८) ही सायंकाळी साडेसहा वाजता अमरावती येथून नागपूरकडे निघाली. सात वाजताच्या दरम्यान नांदगाव पेठ उड्डाणपूलावरून जातांना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस थेट उड्डाणपुलावरील कठड्याला जाऊन धडकली. यामध्ये बस चालक खाली पडल्याने त्याला गंभीर दुखापत झाली आहे. तर, सुदैवाने बसमध्ये असणारे ३२ प्रवासी सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे. सदर घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती.

घटना घडताच नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण काळे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. व संपूर्ण वाहतूक व्यवस्था सुरळीत करून जखमी बस चालकाला रुग्णवाहिकेच्या मदतीने जिल्हा सामान्य रुग्णालयात धाखल करण्यात आले. उड्डाणपूलावर अडकलेली बस क्रेनच्या मदतीने बाजूला करण्यात आली. यामध्ये बसचे प्रचंड नुकसान झाले आहे. घटनेचा पुढील तपास नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण काळे करीत आहे.

Daily Horoscope 4 May 2024 Rashi Bhavishya: 'या' राशींच्या लोकांचे वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस ; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 4 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

'आमचं सरकार आलं तर 50 टक्के आरक्षणाची मर्यादा हटवू' राहुल गांधींची मोठी घोषणा

Garlic: उन्हाळ्यात 'या' लोकांनी लसूण खाणे टाळावे

Cold Water: माठातील पाणी फ्रिजसारखं गार कसं करायचं? जाणून घ्या...