महाराष्ट्र

Baba Siddiqui Murder : 3 महिन्यांपासून केला प्लॅन, YouTube वरून गोळीबार शिकले; बाबांच्या घरीही अनेकदा गेले

बांद्र्यातील झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयावर जवळ बाबा सिद्दीकी यांच्यावर ३ अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला आहे.

Published by : shweta walge

बांद्र्यातील झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयावर जवळ बाबा सिद्दीकी यांच्यावर ३ अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत पोलिसांनी यामध्ये चौघांना ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणात रोज नवमनवे खुलासे समोर येत आहेत. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट ३ महिन्यांपूर्वी रचला जात असल्याची माहिती समोर आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित गटनेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट ३ महिन्यांपूर्वी रचला जात होता. आरोपी बाबा सिद्दीकी यांच्या घरीही अनेकवेळा शस्त्राशिवाय गेले होते. मंगळवारी रात्री मुंबई गुन्हे शाखेने हा खुलासा केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण नियोजन पुण्यात करण्यात आले होते. नेमबाज गुरमेल सिंग आणि धरमराज कश्यप यांनी यूट्यूबवर व्हिडिओ पाहून शूटिंग शिकले. हे लोक मैगजीनशिवाय मुंबईत शूटिंगचा सराव करायचे.

या घटनेनंतर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. चौथा आरोपी हरीश बलकाराम याला १५ ऑक्टोबर रोजी बहराइचमधून पकडण्यात आले. 3 अद्याप फरार आहेत. लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने या हत्येची जबाबदारी घेतली आहे.

मुंबई क्राइम ब्रँचने आतापर्यंत १५ हून अधिक लोकांचे जबाब नोंदवले आहेत, ज्यात घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या अनेक प्रत्यक्षदर्शींचा समावेश आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा