bacchu kadu on thackeray government Team Lokshahi
महाराष्ट्र

Rajya Sabha Election: “मोदींशी बोलून तोडगा काढा, अन्यथा..." बच्चू कडूंचा ठाकरे सरकारला इशारा

आम्ही राज्यसभा निवडणुकीत मतदानाबाबत शेवटच्या पाच मिनिटांमध्ये निर्णय घेऊ...

Published by : Shweta Chavan-Zagade

10 जून रोजी राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. सहाव्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी शिवसेना सध्या मतांची जुळवाजुळव करत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी महाविकास आघाडी सरकारला धान आणि हरभरा खरेदीच्या प्रश्‍नावर कोंडीत पकडले आहे.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलून या विषयावर तोडगा काढावा, अन्यथा आम्ही राज्यसभा निवडणुकीत मतदानाबाबत शेवटच्या पाच मिनिटांमध्ये निर्णय घेऊ, असा इशारा त्यांनी दिला.

तसेच “आमचे मतदान भाजपला जाणार नाही. मात्र, महाविकास आघाडीला देखील शेवटच्या पाच मिनिटांत मतदान करू. संपूर्ण महाराष्ट्रात हरभरा उत्पादकांची संख्या एक लाख तर धान उत्पादकांची संख्या चार ते पाच लाख आहे. केंद्र सरकार शेतमाल खरेदी करीत नाही. त्यामुळे त्यांनी एका हेक्टरला हजार रुपये मदत हरभरा आणि धान उत्पादकांना द्यायला पाहिजे. यासंदर्भात मुख्यमंत्री आणि शरद पवार यांनी मोदींची भेट घेतली पाहिजे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तातडीने हालचाली कराव्यात”. असे बच्चू कडू यांनी सांगितले. सहाव्या जागेसाठी अपक्ष आमदारांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे असताना ऐनवेळी बच्चू कडू यांनी ठाकरे सरकारला इशारा दिला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला?

Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज

Pune Metro : पुणे मेट्रोच्या स्वारगेट–कात्रज मार्गावर दोन नवीन स्थानकांना मंजुरी

Kolhapur Panchaganga River : पंचगंगेची धोका पातळीकडे संथ गतीने वाटचाल; 79 बंधारे अद्यापही पाण्याखालीच