(Bacchu Kadu Protest ) बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज सातवा दिवस आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी यांसह 17 वेगवेगळ्या मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.
बच्चू कडू यांचे अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीमध्ये आंदोलन सुरु असून अन्नत्याग आंदोलनामुळे बच्चू कडूंची प्रकृती खालावली आहे. यासोबतच प्रहारच्या कार्यकर्त्यांकडून विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर आज पंकजा मुंडे, उदय सामंतही बच्चू कडूंच्या आंदोलनाला भेट देणार आहेत. आज दुपारी 12 बारा वाजता कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आंदोलन मागे घ्यायचं की पुढे सुरू ठेवायचं याबाबत ते निर्णय घेणार असून आज निर्णय होईपर्यंत आंदोलन करू नये, अशा सूचना बच्चू कडूंनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.