थोडक्यात
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून बच्चू कडूंनी सरकारला दिलेला अल्टिमेटम संपला
12 वाजल्यानंतर बच्चू कडूंचा रेल रोकोचा इशारा
बच्चू कडू आंदोलनावर ठाम, "जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही, तोपर्यंत हटणार नाही"
(Bacchu Kadu Farmers Protest) बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांचा ट्रॅक्टरसह लाँग मार्च आता नागपूरमध्ये पोहचला आहे. नागपूर वर्धा महामार्गावर ट्रॅक्टरने चक्का जाम करण्यात आला. रात्री रस्त्यावर ठिकठिकाणी चुली पेटल्या.
शेतकऱ्यांनी संपूर्ण संसार रस्त्यावर मांडल्याचे पाहायला मिळाले. बच्चू कडू आंदोलनावर ठाम असून जो पर्यंत मागण्या मान्य होणार नाही तो पर्यंत हटणार नाही असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.आज दुपारी 12 पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास रेल्वे जाम करणार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला असून नागपूर वर्धा महामार्गावर ठिय्या असून वाहतूक ठप्प आहे.
यातच आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून बच्चू कडूंनी सरकारला दिलेला अल्टिमेटम संपला असल्याचे पाहायला मिळत आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत बच्चू कडूंनी सरकारला अल्टिमेटम दिलेला होता. 12 वाजल्यानंतर बच्चू कडूंनी रेल रोकोचा इशारा दिला असून बच्चू कडू आंदोलनावर ठाम आहेत. जो पर्यंत मागण्या मान्य होणार नाही तो पर्यंत हटणार नाही असं म्हणत 12 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता.
मात्र आता बच्चू कडूंनी सरकारला दिलेला अल्टिमेटम संपला असून. 12 वाजल्यानंतर बच्चू कडूंकडू रेल रोकोचा इशारा देण्यात आला आहे. नागपूर वर्धा रोडवर आज देखील मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळत असून सकाळपर्यंत महामार्ग शेजारी असलेले छोटे रस्ते सुरू होते. जो पर्यंत सरकारने कर्जमाफीचे दिलेले आश्वासन पूर्ण करणार नाही तोपर्यंत रस्त्यावरून हटणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे.