महाराष्ट्र

संभाजी भिडेंना सात दिवसाच्या आत अटक करा; बहुजन समाज पार्टीची मागणी

सातत्याने महापुरुषांच्या अपमान करणाऱ्या संभाजी भिडे यांना सात दिवसाच्या आत अटक करण्याची बहुजन समाज पक्षाची मागणी केली आहे.

Published by : Team Lokshahi

प्रशांत जवेरी | नंदुरबार : संतांची भूमी अशी महाराष्ट्राची ओळख आहे. स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज, सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानुसारच वाटचाल करीत पुरोगामी महाराष्ट्राने अवघ्या देशासह विश्वाला प्रेरणा दिली आहे. मात्र काही तथाकथितांकडून सातत्याने या महापुरुषांचा अपमान गेल्या काही काळात केला जात आहे. संभाजी भिडे यांच्याकडून सातत्याने महापुरुषांचा अपमान केला जात आहे.

संभाजी भिडे यांनी यापूर्वी महात्मा गांधी तसेच महात्मा ज्योतिराव फुले व इतर महापुरुषांबद्दल अपशब्द वापरले आहेत. राज्य सरकारचे अभय असल्याने संभाजी भिडे असे अपशब्द बोलत आहेत. राज्य सरकार राजकीय फायदा करण्यासाठी संभाजी भिडे यांच्यावर कुठलीही कारवाई करीत नसल्याचे निदर्शनास येत आहे.

समाजासमाजात दुही निर्माण करणाऱ्या, सातत्याने महापुरुषांच्या अपमान करणाऱ्या संभाजी भिडे यांना सात दिवसाच्या आत अटक करावी अन्यथा सात दिवसानंतर बहुजन समाज पक्ष राज्यभर तीव्र आंदोलन उभारेल. या मागणी साठी आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे बहुजन समाज पक्षाच्या वतीने संभाजी भिडे विरुद्ध निदर्शने करण्यात आली. यावेळी बहुजन समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब ब्राह्मणे, जिल्हा प्रभारी जितेंद्र तायडे, जिल्हा उपाध्यक्ष संतोष यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : पुण्यात अमली पदार्थांचा सुळसुळाट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस चांगला जाईल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे