महाराष्ट्र

साधू मारहाण प्रकरणी सातही आरोपींना जामीन मंजूर

चौघा साधूंना मुले चोरणारी टोळी समजून केली होती मारहाण

Published by : Shweta Shigvan-Kavankar

संजय देसाई | सांगली : साधू मारहाण प्रकरणी अटकेतील संशयित आरोपींना जत न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. उत्तर प्रदेशच्या मथुरा येथील चौघा साधूंना मुले चोरणारी टोळी समजून मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला होता. यानंतर उमदी पोलिसांनी याप्रकरणी 25 जणांवर गुन्हा दाखल करत सात जणांना अटक केली होती.

जत तालुक्यातल्या लवंगा या ठिकाणी दोन दिवसांपूर्वी चौघा साधूंना मुलं चोरणारी टोळी समजून संतप्त जमावाकडून मारहाण करण्यात आली होती. चौघेही साधू कर्नाटकच्या विजापूर येथून जतच्या लवंगा मार्गे पंढरपूरकडे देवदर्शनासाठी निघाले असता रस्ता विचारत असताना हा प्रकार घडला. या घटनेचे संतप्त पडसाद संपूर्ण देशभर उमटले होते. त्यानंतर सांगली पोलिसांनी लवंगा गावातील 25 जणांविरोधात गुन्हे दाखल करत सात जणांना अटक केली होती.

या सात जणांना आज गुरुवारी जत येथील न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं. यावेळी सरकारी व बचाव पक्षाचे वकील यांच्यामध्ये जामीन मंजुरीवरून जोरदार युक्तिवाद झाला. मात्र, जत न्यायालयाने सातही संशयित आरोपींना जामीन मंजूर केला आहे.

दरम्यान, साधू मारहाण प्रकरणाची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली होती. याप्रकरणी फडणवीसांनी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना रशियावरुन फोन करत सविस्तर अहवाल मागितला आहे.

देवेंद्र फडणवीसांनी हे प्रकरण गंभीर प्रकरण असून तुम्ही स्वत: या प्रकरणाकडे लक्ष द्या, तपास कसा सुरु आहे, मारहाण करणारे कोण होते, व्हिडीओ व्हायरल कसा झाला याचा संपूर्ण अहवाल द्या, अशा सूचना त्यांनी पोलीस महासंचालकांना दिल्या आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा