शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजनाचा मुहूर्त ठरला आहे. उद्या बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते स्मारकाचं उद्घाटन होणार आहे. त्यामुळे या उद्घाटन सोहळ्याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बुधवारी 31 मार्च 2021 रोजी सायंकाळी 5.30 वाजता स्मारकाचं उद्घाटन होणार आहे.या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीचे अध्यक्ष तथा पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे विविध माध्यमांद्वारे थेट प्रसारण करण्यात येणार आहे.