महाराष्ट्र

Balasaheb Thackeray Birth Anniversary : बाळासाहेब ठाकरे यांची जयंती महापालिकेत साजरी

Published by : Lokshahi News

मुंबई | शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांनी आज रोजी महापौर दालनातील त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.याप्रसंगी उप महापौर अँड.सुहास वाडकर, सभागृह नेते श्रीमती विशाखा राऊत, स्थापत्य समिती अध्यक्ष (उपनगरे) श्री. स्वप्निल टेंबवलकर , नगरसेविका श्रीमती सुजाता सानप, "डी" विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. प्रशांत गायकवाड हे मान्यवर उपस्थित होते.

तत्पूर्वी, श्यामाप्रसाद मुखर्जी चौकातील (रिगल सिनेमा नजीक) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.याप्रसंगी खासदार श्री. अरविंद सावंत, उप महापौर अँड.सुहास वाडकर, सभागृह नेते श्रीमती विशाखा राऊत,नगरसेविका श्रीमती सुजाता सानप, "ऐ" विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. शिवदास गुरव उपस्थित होते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा