महाराष्ट्र

भारतीय जनता पार्टीचे आंदोलन फसवे – बाळासाहेब थोरात

Published by : Lokshahi News

भारतीय जनता पार्टीचे ओबीसींसाठी रस्त्यावर उतरून केलेले आंदोलन फसवे असल्याची टीका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आज संगमनेर तालुक्याच्या दौऱ्यावर होते. आज त्यांनी महसूल विभाग व आरोग्य विभाग यांच्याकडून संभाव्य करोनाची तिसरी लाट विषय आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये उपजिल्हाधिकारी, प्रांतधिकारी, तहसीलदार, प्रशासकीय अधिकारी तसेच संगमनेर तालुक्याचे आरोग्य विभागाचे सर्व डॉक्टर उपस्थित होते तसेच आमदार सुधीर तांबे दुर्गाताई तांबे आदी मान्यवर उपस्थित होते.

आम्ही वारंवार केंद्र सरकारला विनंती केली की आम्हाला ओबीसी समाजाची आकडेवारी द्या, तर केंद्र सरकार आकडेवारी देण्यास टाळाटाळ करत आहे, असा आरोप त्यांनी केलाय. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आंदोलन केंद्र सरकारच्या विरोधात करावं, असा सल्ला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...