Farmers 
महाराष्ट्र

Farmers : मोठी बातमी! राज्यातील 20 लाख शेतकऱ्यांसाठी बँकांचे दरवाजे बंद, कारण काय?

विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनामुळे अनेक शेतकरी कर्जफेड करण्याऐवजी कर्जमाफीची वाट पाहत आहेत

Published by : Team Lokshahi

(Farmers ) राज्यातील 20 लाख 37 हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी बँकांचे कर्ज फेडलेले नसून, थकबाकीची रक्कम तब्बल 31,254 कोटी इतकी झाली आहे. ही माहिती राज्यस्तरीय बँकर्स कमिटीच्या अहवालातून समोर आली आहे. बीड, बुलढाणा, जालना, नांदेड, परभणी आणि यवतमाळ या जिल्ह्यांत प्रत्येकी दीड लाखांहून अधिक शेतकरी कर्ज थकवणाऱ्यांच्या यादीत आहेत.

खरीप हंगाम सुरू असूनही अनेक बँका शेतकऱ्यांना नवीन कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहेत. सरकारने सिबिल स्कोअरकडे दुर्लक्ष करण्याचे आदेश दिले असले तरी प्रत्यक्षात बँका सिबिल तपासूनच कर्जवाटप करत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनामुळे अनेक शेतकरी कर्जफेड करण्याऐवजी माफीची वाट पाहत आहेत.

राज्यातील एकूण 1.29 कोटी शेतकऱ्यांपैकी जवळपास 20 लाख शेतकरी कर्ज थकवलेले असून, त्यामुळे त्यांना बँकांकडून नवीन कर्ज मिळण्यास अडथळा निर्माण झाला आहे. अतिवृष्टी, हमीभावाचा अभाव, उसाचे अपूर्ण पैसे आणि निसर्गाच्या तडाख्यामुळे त्यांची स्थिती आणखी बिकट झाली आहे.

राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक थकबाकी आहे. यामध्ये नाशिक (2790 कोटी), सोलापूर (2681 कोटी) आणि यवतमाळ (2256 कोटी) जिल्ह्यांचा समावेश आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा