थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Kolhapur) महानगर पालिका निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळाल्याचे पाहायला मिळत आहे.29 महानगरपालिकांमध्ये भाजपा-शिवसेनेच्या महायुतीने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. यातच कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवले आहे.
यानंतर कोल्हापूरकरांचे आभार मानत महायुतीकडून बॅनर लावण्यात आले आहे. हे बॅनर आता चर्चेत आल्याचे पाहायला मिळत आहे. 'धन्यवाद कोल्हापूर तुम्ही काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम केला' असे या बॅनरवर लिहिण्यात आले आहे. त्यामुळे याची चर्चा संपूर्ण कोल्हापूर शहरात सुरू झाली आहे.
Summary
कोल्हापूरात महायुतीने काँग्रेसला डिवचलं
कोल्हापूरमध्ये महायुतीकडून पोस्टरबाजी
मनपा निवडणुकीनंतर पोस्टरबाजी