महाराष्ट्र

काका-पुतण्याच्या लढाईत काका जयदत्त क्षीरसागर यांची सरशी

Published by : Lokshahi News

विकास माने, बीड | बीड तालुका दूध संघाच्या निवडणूकीत काका जयदत्त क्षीरसागर यांनी बाजी मारली आहे. जयदत्त क्षीरसागर गटाचे 13 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे काका-पुतण्याच्या लढाईत काका जयदत्त क्षीरसागर यांची सरशी दिसून आलीय.

बीड तालुका दूध संघाची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. या निवडणुकी निमित्त काका विरुद्ध पुतण्या संघर्ष दिसून आला होता. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर गटाचे 13 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर पुतणे आमदार संदीप क्षीरसागर गटाला एकही उमेदवार मिळाला नसल्यानं त्यांना या निवडणुकीत खाते उघडता आले नाही. दरम्यान काका-पुतण्याच्या लढाईत काका जयदत्त क्षीरसागर यांची सरशी दिसून आलीय. विजयी उमेदवारांचे जयदत्त क्षीरसागर यांनी पुष्पगुच्छ आणि पेढे भरवत अभिनंदन केले आहे.

"हे मोदी सरकार नव्हे, हे तर गजनी सरकार"; उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर डागली 'मशाल'

"कुणी भारताला थप्पड मारली, तर त्याचा जबडा तोडण्याची हिंम्मत आजच्या भारताकडे आहे", सोलापूरात योगी आदित्यनाथ कडाडले

"देशातील वाढत्या महागाईला नरेंद्र मोदीच जबाबदार", मविआच्या सभेत शरद पवारांचा महायुतीवर घणाघात

"नरेंद्र मोदींचं काम पाहून राज ठाकरेंनी..."; शिवतीर्थावर ठाकरेंची भेट घेतल्यानंतर श्रीकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

"...तर सर्वसाधारण कार्यकर्तासुद्धा खासदार बनू शकतो"; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेश म्हस्केंचं मोठं विधान