महाराष्ट्र

भय्यूजी महाराज आत्महत्या प्रकरण; तिन्ही आरोपींना शिक्षा

Published by : Lokshahi News

अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज (Bhaiyyu Maharaj) यांच्या आत्महत्या प्रकरणात इंदूर न्यायालयानं (Indore Session Court) महत्त्वाचा निकाल दिला आहे. मुख्य सेवक विनायक, चालक शरद आणि केअरटेकर पलक यांना न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. सेवकांनी केलेल्या छळामुळेच भय्यू महाराजांनी (Bhaiyyu Maharaj)आत्महत्या केल्याचं न्यायालयानं निकाल देताना म्हटलं. न्यायालयाने मुख्य सेवक विनायक दुधाले, चालक शरद देशमुख आणि केअर टेकर पलक पुराणिक यांना दोषी ठरवले आहे. या सर्वांना 6-6 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

भय्यू महाराज यांनी १२ जून २०१८ मध्ये आत्महत्या केली होती. या प्रकरणात तिघं आरोपींना जानेवारी २०१९ मध्ये अटक करण्यात आली होती. सत्र न्यायालयात साडे तीन वर्षे सुनावणी चालली. न्यायमूर्ती धर्मेंद्र सोनी यांनी महाराजांचे सेवक असलेल्या शरद देशमुख, विनायक दुधाले आणि पलक पुराणिक यांना महाराजांच्या आत्महत्या प्रकरणात दोषी ठरवलं. या तिघांनी पैशांसाठी महाराजांचा छळ केला. त्यांना पैशांसाठी ब्लॅकमेल केलं, असं न्यायमूर्तींनी निकाल देताना म्हटलं.

काही सेवकांवर भय्यू महाराजांनी त्यांच्या आयुष्यात कुटुंबीयांपेक्षा जास्त महत्त्व दिलं. त्यांच्यावर खूप विश्वास टाकला. आपल्या आश्रमाची आणि कामकाजाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली, त्याच सेवकांनी पैशांसाठी महाराजांचा छळ केला. हा छळ इतका जास्त होता की त्यांना आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं, असं सोनी यांनी निकाल सुनावताना म्हटलं.

पलकचा भय्यू महाराजांची संपत्ती हडपण्याचा प्रयत्न

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीनही आरोपी महाराजांची संपत्ती हडपण्याच्या प्रयत्नात होते. त्यासाठी त्यांनी मोठं षडयंत्र रचलं होतं. त्याच माध्यमातून त्यांनी भय्यू महाराज आणि पलक यांचे अनेक अश्लील फोटो बनवले होते. तेच फोटो दाखवून भय्यू महाराजांना धमकी दिली जायची. त्यामुळे भय्यू महाराज प्रचंड खचले. अखेर त्यांनी नैराश्यात जाऊन आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं.

पलक एवढी खतरनाक होती की तिने भय्यू महाराजांना ब्लॅकमेल करुन आश्रमच्या तिजोरी आणि दानपेटीवर ताबा मिळवला होता. एवढंच नाही तर तिने भय्यू महाराजांच्या घराच्या किल्ल्या देखील आपल्या हातात घेतल्या होत्या. ती सर्वांसमोर स्वत:ला भय्यू महाराजांची मुलगी असल्याचं भासवायची. पण वास्तव्यात ती भय्यू यांच्यासोबत प्रेयसी असल्यासारखं वागायची. ती आणि विनायक दर महिन्याला भय्यू महाराजांकडून दीड लाख रुपये वसूल करायचे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Supriya Sule : "मटण खाल्लं तर पाप केलं काय? 'माझ्या पांडुरंगाला चालतं", मांसाहार विषयावरून सुप्रिया सुळेंच थेट उत्तर

Latest Marathi News Update live : मुंबईहून मालवणकडे जाणाऱ्या खासगी बसला आग

Latest Marathi News Update live : मंत्री उदय सामंत यांनी घेतली शरद पवार यांची भेट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींचे मन प्रसन्न राहील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य