Bharat Taxi 
महाराष्ट्र

Bharat Taxi: ड्रायव्हर्सची कमाई अन् प्रवाशांचा खर्च कमी; 'या' दिवसापासून सुरु होणार भारत टॅक्सी

Affordable Rides: भारत टॅक्सी १ जानेवारी २०२६ पासून दिल्लीमध्ये सुरू होत आहे. प्रवाशांना स्वस्त आणि विश्वासार्ह प्रवासाची सोय मिळणार आहे.

Published by : Dhanshree Shintre

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

दिल्लीत राहणाऱ्या प्रवाशांसाठी आणि हजारो टॅक्सी चालकांसाठी नवी सरकारी टॅक्सी सेवा सुरू होणार आहे. केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयाकडून “भारत टॅक्सी” ही नवी टॅक्सी सेवा १ जानेवारी २०२६ पासून दिल्लीमध्ये सुरू होणार असून, या माध्यमातून प्रवाशांना स्वस्त आणि विश्वासार्ह प्रवासाचा नवीन पर्याय मिळणार आहे. ही सेवा थेट ओला, उबर, रॅपिडो यांसारख्या खाजगी टॅक्सी अ‍ॅग्रीगेटर कंपन्यांना टक्कर देणार असल्याचे मानले जात आहे. मोबाइलवर भारत टॅक्सी अॅप डाउनलोड करून प्रवासी सहज टॅक्सी, ऑटो किंवा बाईक बुक करू शकतील.

सरकारचे उद्दिष्ट मोठ्या महानगरांमध्ये वाहतूक अधिक सोयीस्कर आणि परवडणारी करणे, तसेच प्लॅटफॉर्मवर अवलंबून असलेल्या कॅब चालकांचे उत्पन्न वाढवणे असे आहे. दिल्लीनंतर गुजरातमधील राजकोटमध्येही ही सेवा सुरू होणार असून, पुढील काळात देशातील इतर शहरांपर्यंत हा मॉडेल विस्तारण्याची योजना आहे. सध्या दिल्ली आणि राजकोट या दोन्ही ठिकाणी या सेवेच्या चाचण्या सुरू आहेत. दिल्लीमध्ये आतापर्यंत ५६,००० हून अधिक चालकांनी भारत टॅक्सीमध्ये नोंदणी केल्याची माहिती समोर आली आहे.

भारत टॅक्सीचे मोठे वैशिष्ट्य म्हणजे परवडणारे भाडे आणि चालकांना अधिक हिस्सा मिळणे. खाजगी अ‍ॅग्रीगेटरकडून अनेकदा जास्त कमिशन कापले जात असल्याची तक्रार चालकांनी केली होती. या नव्या सेवेअंतर्गत चालकांना त्यांच्या कमाईच्या ८० टक्क्यांहून अधिक रक्कम थेट मिळेल, तर उर्वरित २० टक्के रक्कम ऑपरेशन्स आणि चालक कल्याणासाठी वापरण्यात येईल. त्यामुळे प्रवाशांना कमी भाड्यात प्रवासाची सुविधा मिळेल आणि चालकांचे वास्तविक उत्पन्नही वाढेल, असा सरकारचा दावा आहे.

सरकारी दर्जा आणि नियमनामुळे ही सेवा अधिक पारदर्शक आणि सुरक्षित असेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच ही सेवा सुरू होत असल्याने दिल्लीकरांसाठी हे नवे वर्ष वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे.

  • १ जानेवारी २०२६ पासून दिल्लीमध्ये भारत टॅक्सी सेवा सुरू.

  • प्रवाशांना परवडणारे भाडे, चालकांना जास्त कमाई.

  • मोबाइल अॅपवरून सहज टॅक्सी, ऑटो किंवा बाईक बुकिंग शक्य.

  • सरकारी नियमनामुळे सेवा पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह राहणार.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा