थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Bhaskar Jadhav - Pratap Sarnaik ) आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर या कालावधीत उपराजधानी नागपुरात हे अधिवेशन होणार आहे. विरोधक सरकारला अनेक मुद्द्यांवरुन घेरण्याच्या तयारीत आहेत.
या अधिवेशनात पहिल्यांदाच विधानसभा आणि विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहेत. यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप - प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे. यातच आता भास्कर जाधव आणि मंत्री प्रताप सरनाईक यांची नागपुरात भेट झाल्याची माहिती मिळत असून एकाच हॉटेलमध्ये आल्याने औपचारिक भेट असल्याचे बोलले जात आहे.
अधिवेशनाचे कामकाज आणि विरोधीपक्ष नेते पद यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. अधिवेशानाच्या सुरुवातीलाच भास्कर जाधव आणि मंत्री प्रताप सरनाईक यांच्या भेटीचा व्हिडिओ समोर आला असून राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
Summery
भास्कर जाधव आणि मंत्री प्रताप सरनाईक यांची नागपुरात भेट
एकाच हॉटेलमध्ये आल्याने औपचारिक भेट
अधिवेशनाचे कामकाज आणि विरोधीपक्ष नेते पदावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा