Bhayander Accident 
महाराष्ट्र

Bhayander Accident: भाईंदरमध्ये मूर्धा गावाजवळ दोन डंपरची भीषण धडक; दोन्ही चालक जखमी

Uttan Road: भाईंदरमधील मूर्धा गावाजवळ दोन कचरा डंपरची समोरासमोर धडक होऊन दोन्ही चालक जखमी झाले.

Published by : Dhanshree Shintre

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

भाईंदर पश्चिम येथील मूर्धा गावाजवळ आज सकाळी कचरा वाहतूक करणाऱ्या दोन डंपरमध्ये भीषण अपघात झाला आहे. धडक एवढी जबरदस्त होती की दोन्ही डंपरचे चालक गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ नजीकच्या इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

उत्तन रोड परिसरात मागील काही महिन्यांपासून अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. रस्त्यांच्या सिमेंटिंगच्या कामांनंतर वाहनांची वेग वाढल्याने नियंत्रण सुटण्याच्या घटना घडत असल्याचे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. अरुंद आणि दुभाजक रस्त्यांवर वाहन चालकांचा वाढता वेग व परिसरातील घनदाट वस्ती यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.

स्थानिकांनी या रस्त्यावर वाहतूक नियंत्रण, वेगमर्यादा कठोरपणे लागू करणे आणि नियमित गस्त वाढवण्याची तातडीने मागणी केली आहे, जेणेकरून अशा अपघातांचा सामना टाळता येईल आणि प्रवासी सुरक्षीत राहतील. प्रशासनाकडूनही या दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

  • मूर्धा गावाजवळ दोन डंपरची भीषण समोरासमोर धडक; दोन्ही चालक गंभीर जखमी.

  • उत्तन रोडवर मागील काही महिन्यांपासून अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले.

  • रस्ता सिमेंटिंगनंतर वाहनांचा वेग वाढल्याने नियंत्रण सुटण्याच्या घटना वाढल्या.

  • स्थानिकांनी कठोर वेगमर्यादा, वाहतूक नियंत्रण आणि नियमित गस्त वाढवण्याची तातडीची मागणी केली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा