महाराष्ट्र

भीमा-कोरेगाव प्रकरणी NIA वर प्रश्नचिन्ह; स्टेन स्वामींसंबंधित अमेरिकन अहवालात महत्वपूर्ण खुलासे

भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA)आरोपांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील कार्यकर्ते फादर स्टेन स्वामी यांच्याशी संबंधित महत्वपूर्ण खुलासे झाले आहेत. फादर स्टेन स्वामी यांच्या कॉम्प्युटरमध्ये अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे पेरली असल्याचे एका अहवालात उघड झाले आहे. यामुळे भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA)आरोपांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत.

जानेवारी 2018मध्ये पुण्यात भीमा कोरेगाव येथे हिंसा भडकली होती. त्यानंतर फादर स्टेन स्वामींना 2020 मध्ये नक्षलवाद्यांशी संबंधांच्या आरोपाखाली एनआयएने अटक केली होती. एनआयएने आपल्या तपासात फादर स्टेन स्वामी आणि माओवादी नेत्यांमध्ये कथित इलेक्ट्रॉनिक संवादाचे गंभीर आरोप केले होते. तसेच, स्वामींवर एल्गार परिषदेत चिथावणीखोर भाषण दिल्याचा आरोप केला होता.

हे आरोप स्वामींनी फेटाळून लावले होते. एनआयएने माझ्यासमोर अनेक आरोप ठेवले. नक्षलवाद्यांशी माझा संबंध असल्याचं दाखवणारी ही कागदपत्रं होती. मात्र, हे एक षडयंत्र आहे. कोणी तरी चोरून माझ्या कॉम्प्युटरमध्ये ही कागदपत्रं टाकली आहेत, असा दावा त्यांनी त्यावेळी केला होता. यानंतर आता अमेरिकन फॉरेन्सिक फर्मनेही फादर स्टेन स्वामी यांचा कॉम्प्युटर अहवाल दिला आहे. यात अनेक खुलासे झाले आहेत.

आर्सेनल कन्सल्टिंग, फादर स्टॅन स्वामींसाठी वकिलांनी नियुक्त केलेल्या बोस्टन-आधारित फॉरेन्सिक संस्थेचे म्हणणे आहे की, तथाकथित माओवादी पत्रांसह सुमारे 44 कागदपत्रे अज्ञात सायबर हॅकरने त्यांच्या कॉम्प्युटरमध्ये पेरली होती. स्टेन स्वामीच्या कॉम्प्युटरचा अॅक्सेस हॅकरने मिळवला होता. यामुळे आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सुरुवातीच्या काळात स्टेन स्वामी यांनी पाद्री म्हणून काम केले. पण, नंतर आदिवासींच्या हक्कांसाठी लढायला त्यांनी सुरुवात केली होती. मानवाधिकार कार्यकर्ते म्हणून त्यांनी झारखंडमध्ये विस्थापनविरोधी जनविकास चळवळही स्थापन केली. ही संघटना आदिवासी आणि दलितांच्या हक्कांसाठी लढते. फादर स्टेन स्वामी हे देखील झारखंड ऑर्गनायझेशन अगेन्स्ट युरेनियम रेडिएशनशी संबंधित होते. या संस्थेने 1996 मध्ये युरेनियम कॉर्पोरेशनच्या विरोधात आंदोलन सुरू केले होते. त्यानंतर चाईबासा येथील धरणाचे बांधकाम थांबवण्यात आले होते. 2010 मध्ये फादर स्टेन स्वामी यांचे 'ट्रुथ ऑफ प्रिझनर्स इन जेल' हे पुस्तक प्रकाशित झाले होते. यामध्ये आदिवासी तरुणांना नक्षलवादी असल्याच्या खोट्या आरोपाखाली तुरुंगात कसे डांबण्यात आले, हे नमूद केले होते. मागील वर्षी त्यांचा मृत्यू झाला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?