थोडक्यात
राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस
पंढरपुरात भीमा नदीने ओलांडली इशारा पातळी
चंद्रभागा नदीच्या वाळवंटातील सर्व मंदिरे गेली पाण्याखाली
(Pandharpur Bhima River )राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे नदी, नाले तुडुंब भरले. अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांच्या पीकांचे अतोनात नुकसान झालं आहे. याच पार्श्वभूमीवर भीमा आणि नीरा नदीच्या खोऱ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीने पंढरपुरात इशारा पातळी ओलांडली आहे. भीमा नदी दुधडी भरून वाहत आहे. पंढरपूरच्या व्यास नारायण झोपडपट्टीमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे.
पंढरपूर कर्नाटकला जोडणाऱ्या गोपाळपूर येथील जुना पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली असून चंद्रभागा नदीच्या वाळवंटातील सर्व मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. तालुक्यातील बंधारे देखील पाण्याखाली गेल्याने वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. नदीकाठच्या लोकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.