महाराष्ट्र

Pandharpur By-Election; भाजपला धक्का, स्टार प्रचारक कोरोना पॉझिटिव्ह

Published by : Lokshahi News

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना भाजपला मोठा धक्का बसला आहे. या निवडणूकीतील स्टार प्रचारकाला कोरोनाची बाधा झाली आहे.

भाजप नेते आणि विधानपरिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारासाठी मतदारसंघात फिरत असताना रणजीतसिंह मोहिते पाटील यांना कोरोनाची लक्षणे आढळली होती. त्यांनंतर चाचणी केली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

निवडणुकीच्या प्रमुख शिलेदारालाच विलगीकरणात जावे लागल्याने भाजपाला आणखी एक धक्का मानला जात आहे. दरम्यान संपर्कात आलेल्यांनी कोरोना तपासणी करून घेण्याचे आवाहन रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी केले आहे.

पंढरपूर पोटनिवडणूक

राष्ट्रवादीचे नेते भारत भालके याच्या मृत्यूनंतर रिक्त असलेल्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक चांगलीच चुरशीची होणार आहे. भाजपकडून समाधान महादेव आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.राष्ट्रवादीने भारतनाना भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भारत भालके विरुद्ध समाधान आवताडे यांच्यात लढत होत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Resham Tipnis : लेकाचा फोटो वापरल्याने एकच गोंधळ, अभिनेत्री संतापली म्हणाली की, 'ज्याने हे वाईट...'

NEET-UG 2025 : निकालांविरुद्धची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर