(Vidhan Bhavan Security) जितेंद्र आव्हाड आणि गोपिचंद पडळकर यांचे कार्यकर्ते विधानभवनाच्या आवारातच एकमेकांना भिडले.यामुळे विधानभवनात जोरदार गोंधळ निर्माण झाला. यावर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आताविधानभवनातील राड्यानंतर सुरक्षेसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आज विधान भवनमध्ये कोणत्याही प्रकारचे शासकीय कर्मचारी, अधिकारी यांना विधानभवनमध्ये विशेष परवानगी पत्र घेऊनच प्रवेश घ्यावा लागणार आहे.
यलो पासधारकांना आज विधानभवनात प्रवेश नसणार आहे तर ग्रीन पासधारकांनाच विधानभवनात सोडण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. विधानभवन कामकाजाचा आज शेवटचा दिवस आहे.