महाराष्ट्र

बिगबॉस फेम अभिजित बिचुकले पुन्हा निवडणुकीच्या मैदानात; खासदार उदयनराजेंविरोधात ठोकणार शड्डू…

Published by : Lokshahi News

प्रशांत जगताप | बिगबॉस फेम अभिजित बिचुकले Abhijit Bichukle पुन्हा चर्चेत आले आहेत. ते पुन्हा निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे. खासदार उदयनराजे भोसले Udayan Raje Bhosale यांच्या विरोधात ते निवडणूक लढवणार आहे.

सातारा नगर पालिकेत चाललेला भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी बिगबॉस फेम अभिजित बिचुकले Abhijit Bichukle खा.उदयनराजेंच्या Udayan Raje Bhosale सातारा विकास आघाडीविरोधात सातारा पालिकेत स्वाभिमानी सातारकर विचारमंच या नावाने पॅनल उभे करणार असल्याची घोषणा केली आहे.

खासदार उदयनराजे भोसले Udayan Raje Bhosale शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या विरोधात पराभूत झाले असून अभिजित बिचुकले Abhijit Bichukle यांच्याकडून पराभूत झाले तर वावगं काय? असा सवाल उपस्थित करत आगामी पालिकेच्या निवडणुकीत शड्डू ठोकणार असल्याचे स्पष्ट केलं आहे.

दरम्यान याआधी सुद्धा बिचुकले Abhijit Bichukle यांनी निवडणूक लढवली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विरोधात ते निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. दरम्यान आता खासदार उदयनराजे भोसले Udayan Raje Bhosale विरोधातील निवडणूक ते जिंकतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा