महाराष्ट्र

गिनीज बुकात नावलौकिक मिळवलेल्या गज्या बैलाचा मृत्यू

Published by : Lokshahi News

संजय देसाई | महाराष्ट्रातील सर्वात मोठा बैल म्हणून गिनीज बुकात नावलौकिक मिळवलेल्या गज्या बैलाचा मृत्यू झाला आहे. या बैलाचे सहा फूट उंच आणि दहा फूट लांब तसेच जवळपास एक टन वजन अशी या बैलाची शरीरयष्ठी होती. याच बैलाने कृष्णा सायमोते यांना कर्जातून मुक्त केले होते. दरम्यान त्याच्या अशा जाण्याने सायमोते कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

जन्म बैलाचा पण देह हत्तीचा असणाऱ्या सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज येथील गज्या बैलाने अखेरचा श्वास घेतला आहे. कृष्णा सायमोते आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सहा फूट उंच आणि दहा फूट लांब तसेच जवळपास एक टन वजन असलेल्या गज्याला आपल्या घरातील सदस्यांप्रमाणे वाढवले होते.

महाराष्ट्रासह अनेक राज्यांमधील कृषी प्रदर्शनात विशेष आकर्षण राहिलेल्या गज्याने आजवर अनेक पुरस्कार मिळवलेले आहेत. त्याच्या अवाढव्य शरीरयष्टी, देखणेपणा आणि वजनामुळे जन्म बैलाचा पण देह मात्र हत्तीचा असलेल्या गज्याला कृषी प्रदर्शनात मोठी मागणी असायची.तसेच गजा बैलाने या माध्यमातून मालक सायमोते यांना कर्जमुक्त केले होते. त्यांच्या कुटुंबियांनी त्याला न विकता त्याचा शेवटपर्यत सांभाळ केला. काल बुधवारी दुपारी त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला.

कृष्णा सायमोते यांनी त्यांच्या घरच्या शेतात गज्यावर अंत्यसंस्कार केले. गज्याच्या अकाली जाण्याने कसबे डिग्रजसह तमाम बैलप्रेमींनी हळहळ व्यक्त केली. प्रचंड देह आसलेल्या गजाच्या हाडांचा सापळा संग्राहलयात ठेवण्यासाठी शास्त्रीयदृष्ट्या प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadnavis on Thackeray Brothers : "ब्रँडचा बॅन्ड वाजवला" मुख्यमंत्र्यांनी ठाकरे बंधूंना खोचक टोला

आजचा सुविचार

North Korea Ban Ice Cream Word : उत्तर कोरियात ‘आईस्क्रीम’ शब्द नॉट अलाऊट! किम जोंग उनचा नवा हुकूम

Lipstick Shades : जाणून घ्या, कोणत्या स्किन टोनवर कोणती लिपिस्टिक सुंदर दिसते