थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Mumbai) मुंबई महानगर पालिका निवडणुकीचा निकाल हाती आला असून यामध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. महापालिका निवडणुकीत महायुतीने बाजी मारली असून 29 पैकी 24 पालिकांवर महायुतीची सत्ता आल्याचे पाहायला मिळत आहे.
मुंबई महानगर पालिका निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळाल्याचे पाहायला मिळत आहे.29 महानगरपालिकांमध्ये भाजपा-शिवसेनेच्या महायुतीने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आता मुंबई महापालिका यशानंतर भाजपने ठाकरेंना डिवचल्याचे पाहायला मिळत आहे.
मातोश्री परिसरासह मुंबईत भाजपने जोरदार बॅनरबाजी केली असून "महाराष्ट्राचा एकमेव धुरंदर, आपले देवेंद्र" असे म्हणत भाजपकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. मुंबई युवा मोर्चा अध्यक्ष व नवनिर्वाचित नगरसेवक तेजिंदर तिवाना यांनी हे बॅनर लावले असल्याची माहिती मिळत आहे.
Summary
मुंबई महापालिका यशानंतर भाजपने ठाकरेंना डिवचलं
मातोश्री परिसरासह मुंबईत भाजपची जोरदार बॅनरबाजी
"महाराष्ट्राचा एकमेव धुरंदर, आपले देवेंद्र"