थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Thane BJP) ठाणे पालिकेत सत्ता स्थापनेला वेग आल्याचे पाहायला मिळत असून भाजपाकडून मोर्चेबांधणी करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपकडून ठाण्यात बॅनर लावण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.
ठाण्यात भाजपाची ताकत वाढल्याचा भाजपाने केला दावा करत 'शीळ ते वडवली भाजपा वाढवली' असे लिहिलेले बॅनर ठाण्यात लावण्यात आले आहे.
यासोबतच 'भाजपला 2 वर्ष महापौरपद पाहिजे नाहीतर, विरोधात बसायला तयार' अशी भाजपा आमदार निरंजन डावखरे यांची स्पष्ट भूमिका असल्याची माहिती मिळत आहे.
Summary
ठाणे पालिकेत सत्ता स्थापनेला वेग, भाजपाकडून मोर्चेबांधणी
'शीळ ते वडवली भाजपा वाढवली'
ठाण्यात भाजपाची शिवसेनेला सूचक इशारा देत बॅनरबाजी