थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(BJP Nagpur) येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता नागपूरात भाजपकडून मोठी कारवाई करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.
महापालिका निवडणुकीत पक्षशिस्तभंग केल्याप्रकरणी भाजपने मोठी कारवाई केली असून अधिकृत उमेदवारांविरोधात निवडणूक लढवणाऱ्या 32 जणांचे निलंबन करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. भाजप शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांचाकडून पदाधिकाऱ्यांना सहा वर्षांसाठी निलंबनाचा निर्णय घेण्यात आला आहे.
निलंबितांमध्ये माजी महापौर अर्चना डेहनकर यांचे पती विनायक डेहनकर यांचा समावेश असून माजी नगरसेवक दीपक चौधरी यांनाही पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. पक्षाच्या उमेदवारांविरोधात काम करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून विविध प्रभागांतील कार्यकर्ते आणि उमेदवारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. प्रभाग 1 ते 34 मधील एकूण 32 जणांची पक्षातून हकालपट्टी केली असून महापालिका निवडणुकीत बंडखोरी खपवून घेतली जाणार नाही असे म्हणत इशारा देण्यात आला आहे.
Summary
नागपुरात भाजपची मोठी कारवाई
निवडणुकीत पक्षशिस्तभंग केल्याप्रकरणी कारवाई
निवडणूक लढवणाऱ्या 32 जणांचे निलंबन