थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Nashik BJP) आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्ष आता जोरदार तयारीला लागले आहेत. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
30 डिसेंबरपर्यंत महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येणार होते.आज 31 डिसेंबर रोजी उमेदवारांच्या अर्जाची छाननी होणार आहे. तर 2 जानेवारी 2026 पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणार आहेत. यातच काल अनेकांना उमेदवारी नाकारल्याने इच्छुकांनी नाराजी व्यक्त केली.
काल उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरलं. यामध्ये अनेक जणांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपने 22 माजी नगरसेवकांचे तिकीट कापले आहे. यामध्ये भाजपात आलेले माजी महापौर अशोक मुर्तडक, माजी सभागृह नेता सतीश सोनवणे, शशिकांत जाधव यांचा समावेश आहे.
Summery
नाशिक महापालिका निवडणूक
22 माजी नगरसेवकांची भाजपने कापली तिकीट
अशोक मुर्तडक,सतीश सोनवणे, शशिकांत जाधव यांचा समावेश