थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(BJP candidate) भाजप उमेदवारांचा मतदानाआधीच विजय झाल्याचे पाहायला मिळत आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत दोन नगरसेविकांची बिनविरोध निवड झाली.
प्रभाग क्रमांक 18 अ मधून रेखा चौधरी, तर 26 क मधून आसावरी नवरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. दोन्ही प्रभागात प्रत्येकी एकच अर्ज आल्याने बिनविरोध निवड झाली असल्याची माहिती मिळत आहे. 2 नगरसेविकांची बिनविरोध निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून त्यांचे अभिनंदन देखील करण्यात आले आहे.
येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
Summery
भाजप उमेदवारांचा मतदानाआधीच विजय
कल्याण डोंबिवलीत 2 नगरसेविकांची बिनविरोध निवड
मुख्यमंत्री फडणवीसांकडून दोन्ही नगरसेवकांचं अभिनंदन